महाकवी सावरकर

आजपर्यंत सावरकरांवर खूप कार्यक्रम झाले. पण कवी सावरकर यावर कार्यक्रम झालेला नाही . आणि सावरकर म्हणलं की संघर्ष ,क्रांतीलढा याच गोष्टी डोळ्यासमोर येतात . पण त्यांच्यात एक हळुवार कवी पण लपला होता ,हा एक वेगळाच अनुभव या कार्यक्रमामधून लोकांना मिळतो .

या कार्यक्रमात सादर होणारी सावरकरांनी लिहीलेली लावणी आणि भावगीत हे प्रेक्षकांना चकित करून टाकतात . धनश्री लेले यांचे लेखन व निवेदन या कार्यक्रमाला फारच वरचा दर्जा प्राप्त करून देते . हा कार्यक्रम सगळ्यांनी बघावा असाच आहे .

                                                                                                                  अतुल दाते
                                                                                                              (अतुल थिएटर्स )                           


































~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

महाराष्ट्राला साहित्य, संस्कृती, संगीत, चित्रपट, नृत्य अश्या अनेक विधांची परंपरा आहे. त्यात सांगीतिक तसेच व्ह्याख्यानप्रधान विषय अनेकदा मांडले जातात. एखादी संहिता आखून, त्याविषयाला अनूरूप प्रचलित गाणी, काही वेळेला अप्रकाशित गाणी घेऊन कार्यक्रम सादर केला जातो. साहित्य, संगीत, लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रांत अभूतपूर्व, ठाशीव कामगिरी केलेल्या महान व्यक्तिंच्या कार्याचा आढावा, निवेदन/ निरूपण तसेच गीतांद्वारे रसिकांसमोर मांडला जातो.

या अशाच कल्पनेतून "महाकवी सावरकर" कार्यक्रमाची रचना झाली. सावरकरांच्या कविता, त्यांचे रसग्रहण, परिचित तसेच नवीन गाणी असे या कार्यक्रमाचे स्वरूप होय. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर ही १२ अक्षरे उच्चारताना एक उत्साह, चेतना, ऊर्जाप्रवाह असल्यासारखे वाटते. सावरकरांच्या कणखर, देशप्रेमी, राष्ट्रभक्ति, हिंदुत्व, तसेच हळवेपण अश्या अनेक पैलूंचा उलगडा लोकांसमोर होतो. त्यांच्या कविता, कवनं, पोवाडे, फटके, भक्ति-भावगीते ही जनजागृती करणारीच आहेत, हे ती सर्व गाणी अभ्यासताना जाणवलं.

ही सर्व गाणी केवळ या कार्यक्रमाचा भाग नसून ती प्रत्येक श्रोत्याला मुखोद्गत व्हावी, व आपण सर्वांनीच त्यातून प्रेरणा घ्यावी असे वाटते. सावरकर हे परिस्थितीनी जरी राजकारणी झाले असले, तरी ते वर नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रभक्त होतेच पण एक सृजन कवी मनाचे देखील एक मनस्वी व्यक्तिमत्व होते, नव्हे, या कवितांच्या रूपात ते आपल्याल आहेतच, असा अनुभव "महाकवी सावरकर" हा कार्यक्रम सादर करताना नित्य येतो.

- श्रीरंग भावे, गायक (मुंबई)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भूमिका
सावरकर म्हणजे राष्ट्रनिष्ठा ,प्रखर राष्ट्रवाद ,धगधगीत तेज पण याचबरोबर ,सावरकर म्हणजे एक हळवं ,संवेदनशील मन सुद्धा . सावरकरांच्या कविता वाचत असताना या संवेदनशील मनाची जाणीव क्षणाक्षणाला होते . त्यांचं काव्य हे मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या ओढीनं स्फुरण पावलेलं आहे . हे मातृभूमी तुजला मन वाहियले वक्तृत्व वाग्विभावाही तुज अर्पियले , या त्यांच्या काव्यानुसार ,खरोखरच त्यांचे काव्य हे मातृभूमीसाठी समर्पित आहे . जसं कुसुमाग्रज म्हणतात ,"जर तुम्ही माझ्या कवितेशी बोलत असाल ,तर माझ्याशी बोलूच नका ,माझ्या कवितेतच मी तुम्हाला सापडेन बराचसा . "तसंच सावरकर सुद्द्धा बरेचसे  त्यांच्या कवितेतून आपल्याला सापडतात .

काव्याचे वैविध्य व वैशिष्ठ्ये
त्यांच्या काव्याचा विषय जरी मातृभूमीशी निगडीत असला तरीही फटके ,पोवाडे ,स्तवन ,स्तोत्र ,भावकविता ,नाट्यपद इतकच नाही ,तर लावणी सुद्द्धा त्यांच्या लेखणीतून साकारली आहे . हे सगळेच प्रकार इतके जातिवंत आणि अस्सल आहेत , की कधी सावरकर पंताच्या तर कधी संताच्या भूमिकेत दिसतात . पण एकदा का ते समजायला लागले की त्यातली अविट गोडी , त्यातला समृद्द्ध आशय ,प्रतिभेची भरारी हे सगळंच आपल्याला मंत्रमुग्ध करते . परिस्थितीने मला जरी राजकारणी बनवलं असलं तरीही वृत्तीने मी कवी आणि कलावंतच  आहे असं म्हणणाऱ्या महाकवी सावरकरांना त्यांच्या जयंती निमित्त मनःपूर्वक अभिवादन .

हा कार्यक्रम करत असताना एक दडपण मनावर निश्चित असतं . कारण सावरकर म्हणजे एक तेजस्वी शिवधनुष्य आहे . त्यामुळे हे आपण पेलू शकू का हे दडपण असते. पण त्याचबरोबर त्यांच्या प्रतिभेला आणि विचारांना या निमित्तानं थोडासा स्पर्श करण्याची संधी मिळते हा आनंदही मनात असतो.

 

-धनश्री लेले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Best Clicks:







posted under |

9 comments:

deo said...

can we have sound track atleast one song here? it will help people to make up their mind to come to the progremme.

Tveedee said...

I attended this program today at Bal Shikshan Auditorium. I had also attended it last year. Here are some of my comments and observations :
1. We really missed the "Tanaji cha powada" and "Raaygad cha powada"
2. Sagara Pran TaLmaLla could be presented in all three version ( Babuji , Hrudaynath and Mr Anand Joshi's version ) .. may be once stanza in each !
3. Dhanashree Lele is awesome .. she keeps the audience spell bound. Depth of her knowledge , her oration , vocabulary and intellect is stunning . She is simply brilliant in her research and presentation. No wonder that Mr Arun Date has named her Saraswati !

4. I have attended other programs of Atul theater at Bal Shikshan Auditorium earlier and all of them have been of very high quality !

I wish all the artists all the best wishes and congratulate them for their brilliant performance.

Tveedee

Unknown said...

Thank You!! Tveedee for your comment on our blog. We will convey your suggestions and appraisals to the producer of this show!!
We expect your visits and comments on our blog to encourage us to keep up the good work.

Keep Visiting!!
Team Eventmay

Shrirang Bhave said...

hi Tveedee

Shrirang Bhave here, i am a part of this concept Mahakavi Sawarkar as a singer

1.We will incorporate The Powada in our upcoming concerts..will convey this to Mr.Atul Date
2. As Of Ne Majasi Ne, The Hridaynathji, Babuji version is well known and as mentioned in the concert we wanted to present the new fresh tune....the earlier tunes cant be presented as a Medley together....as all three have different flavours (My Opinion)

Thanks again for your views and comments! keep attending our novel concepts,,

Shrirang Bhave said...

http://www.youtube.com/watch?v=Jj2EDkHqDf0

PLEASE VISIT THIS VIDEO LINK for the ZALAK of this programme MAHAKAVI SAWARKAR ....copyrights - Atul Arun Date (Atul Theatres)

Bhakti Athavale said...

'महाकवी सावरकर' हा कार्यक्रम श्रवणानंदाबरोबरच ज्ञानानंदसुद्धा देतो, हे निश्चित ! संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा !
* या ब्लॉगवरील फोटोसुद्धा अतिशय उत्तम आहेत. त्याकरता सना सोहोनी यांचंही अभिनंदन !

Tveedee said...

Hi Shrirang,
Yes.. the idea of medley with one stanza of each musician and may be, full composition in Anant Joshi's music makes sense. When all the three versions are presented , it would give a different perspective. Also a chance for the singers to present their skills.
I remember last year's program when we were promised that the powadas will be presented in "next" program. But this year too those Savarkar's powadas ( which mesmerized Lokmanya Tilak and Khare ) were missing !
Hope we hear those in next concert !

Best Wishes

Tveedee

r v ghanekar said...

asa programme ekhada ratnagirit pan karawa :)

Anonymous said...

महाकवी सावरकर:
वि. दा. सावरकर हे नाव कानावर पडले की आपल्या मनात प्रखर राष्ट्रभक्ती हाच एक विचार येतो. परंतु २८ मे २०१३ सदर झालेला महाकवी सावरकर ह्या कार्यक्रमाने सावरकरांची एक हळव्या मनाचा कवी अशी वेगळी ओळख रसिकश्रोत्यांना करून दिली.. हा कार्यक्रम म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उत्कृष्ट काव्यप्रतिभेचा उत्तुंग आविष्कार घडवणारी सुरेल मैफल असेच म्हणावे लागेल... धनश्री लेले यांचे निवेदन, अंजली दाते, श्रीरंग भावे व शरयू दाते यंचे मंत्रमुग्ध करणारे स्वर या साऱ्यांमुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला..
या कार्यक्रमामुळे सावरकरांच्या हळुवार कविमनाचे फार जवळून दर्शन झाले आणि त्यांच्या कविता या मातृभूमिलाच समर्पित होत्या हे फार प्रकर्षाने जाणवले.. मुळात सावरकर आणि कविता हे समीकरणच आमच्या पिढीसाठी नवीन आहे.. परंतु अतुल theatres प्रस्तुत ‘महाकवी सावरकर’ या कार्यक्रमातून अतुल दाते व सहकार्यांनी मिळून हे समीकरण सहजगत्या सोडवले आणि रसिकांना सावरकरांच्यात लपलेल्या हळुवार मनाच्या कवीचे दर्शन घडवले.. “हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वाग्विभावाही तुज अर्पियेले” हे शब्द सावरकर अक्षरशः जगले तसेच सावरकरांनी फटके, पोवाडे, कवने, भावगीते, लावणी नाट्यपदे इ. प्रकार आपल्या सिद्धहस्त लेखणीतून लीलया साकारले आणि त्यातून समाजप्रबोधन कसे केले हे या कार्यक्रमामुळे रसिकांना कळले..
या कार्यक्रमाबद्दल आवर्जून नमूद करावेसे वाटते ते म्हणजे, धनश्री लेले यांनी ओघवत्या भाषेत केलेले निवेदन. ‘ओघवते’ हा शब्द उच्चारला कि डोळ्यांसमोर येतो तो उंचावरून फेसाळत जोरात खाली येणारा शुभ्र पाण्याचा धबधबा.. या धबधब्यासारखेच धनश्री लेले यांचे निवेदन होते आणि या धबधब्यात सारे श्रोते चिंब भिजून गेले.. ही सारी गाणी, निवेदन ऐकताना मनात आदर, डोळ्यात अश्रु आणि शरीरावर क्षणोक्षणी उभे राहणारे रोमांच यांचा खेळ चालू होता कारण या निवेदनाबरोबरच अंजली दाते, श्रीरंग भावे व शरयू दाते यांनी आपल्या मधुर स्वरांची बरसात केली.. तसेच श्री अनंत जोशी यांनी ‘सागरा प्राण तळमळला’ या गाण्याला लावलेली नवीन चाल हे एक surprise होते रसिकांसाठी.. हि नवीन चाल सुश्राव्य आहे.. हे शिवधनुष्य श्री जोशी यांनी लीलया उचलले आणि गायकांनी तितक्याच समर्थपणे गाऊन त्याला रसिकांच्या पसंतीची प्रत्यंचा लावली..
आज हा कार्यक्रम होऊन तीन दिवस उलटले तरीही वि. दा. सावरकर या सुगंधी अत्तररुपी सुवासाने मन भरून गेलय.. मला अतिशय आनंद होतोय कारण मी या साऱ्याचा आस्वाद घेऊ शकले.. हा कार्यक्रम असाच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहो याच माझ्यातर्फे या सार्यांना शुभेच्छा!!
अनघा पराष्टेकर...

Post a Comment

Newer Post Home

Global Visitors

Total Pageviews

Followers


Recent Comments