शब्दांच्या पलिकडले

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
NFBM संस्थेबद्दल थोडी माहिती:-

आळंदी देवाची इथे ही संस्था वसलेली असून सध्या तिथे १४ मुली शिक्षण घेत आहेत . त्यातील बहुसंख्य मुली खानदेश , मराठवाडा विदर्भ यातील ग्रामीण भागातून आल्या आहेत . शिक्षणाबरोबरच इथे मुलींची राहण्याची , जेवण्याची वैद्यकीय मादितीची मोफत सोय केली आहे . हा सर्व खर्च NFBM तर्फे केला जातो . साली महाराष्ट्र सरकार ने मुलींसाठी अनुदान मान्य केले होते . ते गेल्या वर्षांपासून तेवढेच आहे . उरलेल्या मुलींचा सगळा खर्च हितचिंतक , स्वयंसेवी संस्था आणि इतर corporate sector च्या मदतीने चालविला जातो .

श्री तापकीरांकडून त्यांचे हे कार्य आईकून मी भारावून गेले आणि माझ्या गाण्याने त्या मुलींच्या चेहऱ्यावर आलेल्या हास्यापलीकडे मी त्याचं देणं लागते ,अस मला प्रकर्षाने जाणवू लागलं . त्यातून जन्म झाला या नव्या संकल्पनेचा ! वैयक्तिक मदतीला असणारी मर्यादा जाणवून एक कलाकार म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार करून मी ठरवले कि एका वेगळ्या विषयाचा सांगीतिक कार्यक्रम करून रसिकांना आनंद मिळवून द्यायचा आअनि त्याच वेळी त्या कार्यक्रमातून मिळणारा निधी या संस्थेला दान करून आपला खारीचा वाटा निभवायचा .

"शब्दांच्या पलिकडले  " कार्यक्रमाची हि जन्मकथा ! ज्येष्ठ गायक श्री राविन्द्रजी साठे , ज्येष्ठ गायिका श्रीमती अनुराधाबाई मराठे , तरुण गायक श्रीरंग भावे little champ शरयू दाते माझ्यासमवेत या उपक्रमात सहभागी होत आहेत . आपण सर्वांनी या कार्यक्रमाची तिकिटे विकत घेऊन या उपक्रमाला हातभार लावावा हि वनांती ! काही कारणाने आपले कार्यक्रमाला येणे जमत नसेल तर आपण ONLINE DONATION पण करू शकता-

कार्यक्रमाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे-

"चुकवू नये असा एक कार्यक्रम "- शब्दांच्या पलीकडले !
तीन पिढ्यांचा सांगीतिक प्रवास उलगडणारी एक अवीट मैफल ! सतत होणार्या अनेक सांगीतिक कार्यक्रमांपेक्षा यात काय आहे एवढे वेगळे ?

तर त्यामागे दडलेली एक छोटीशी गोष्ट सांगायला माल आवडेल . अनेक उभरती गायिका म्हणून उदयाला येत असतानाच अभ्यासातही माझी प्रगती उत्तमच होती . MBA FINANCE प्रथम श्रेणीत पास झाल्यावर चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मिळत असतानाही मी संगीत हि माझी कार्यभूमी निश्चित केली . संगीत क्षेत्रात हळूहळू नाव कमावल्यावर मी माझे पती श्री मनीष देशमुख आम्ही दोघांनी मिळून Plus One Venture या नावाची संगीत विषय कार्यक्रम , कार्यशाळा सल्ला देणारी संस्था स्थापन केली .

सामाजिक भान जपणाऱ्या संस्कारांची जाणीव मनांत सतत जागी असल्याने मी अधून मधून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमधून "सेवा " म्हणून कार्यक्रम करीत होते . संस्थांचा शोध घेण्याच्या माझ्या मोहिमेतून NFBM तर्फे चालविण्यात येणाऱ्या जागृती अंध मुलींची शाळा या संस्थेपर्यंत पोहोचले .

Oct-2012 मध्ये मी एक गाण्याचा कार्यक्रम तिथे केला . माझ्या गाण्यामुळे त्या मुलींच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद , त्यांनी उत्स्फूर्तपणे  केलेलं नृत्य या सर्वांनी समाधानी होत मी परतले . परंतु संस्थेचे मानद अध्यक्ष श्री तापकीर यांच्याशी झालेली चर्चा  आठवून मला खूप अस्वस्थ होत होते . शाळेचे सर्व पदाधिकारी अंध असूनही अत्यंत कुशलतेने ते शाळेचा सर्व कारभार पाहत होते हे माझ्यासाठी अविश्वसनीय होते.

शिक्षण , प्रशिक्षण पुनर्वसन हे अंधांच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असे घटक आहेत . महाराष्ट्रात अंधांसाठी एकूण  शाळा असूनही दुर्दैवाने फक्त अंध मुले शाळेत शिक्षण घेत आहेत . बाकी बरीच त्यापासून वंचित आहेत हे बघून  NFBM या संस्थेने जागृती अंध मुलींच्या शाळेची स्थापना केली .

-सई टेंभेकर (Plus One Venture)
     Singer & Organizer
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 
Some Clicks:-



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

posted under |

0 comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home

Global Visitors

Total Pageviews

Followers


Recent Comments